Wednesday, September 8, 2010

मैत्री...

दोन मनांना सांधाणारा पूल म्हणजे मैत्री..
ग्रीश्मातालं शेवंतीच फूल म्हणजे मैत्री..

अवघड वळणावर मारलेला 'कट' म्हणजे मैत्री..
आयुष्यातली गोड्गुलाबी पहाट म्हणजे मैत्री..

तुटत्या तार्र्याकड़े मागितलेली इच्छा म्हणजे मैत्री..
रिकाम्या बेंच वर केलेली प्रतीक्षा म्हणजे मैत्री..

परिक्षेआधी मारलेली नाईट म्हणजे मैत्री..
प्रिंटआउट वरून झालेली फाईटही मैत्रीच..

गालावरचा अश्रु अन खळी सुद्धा मैत्री..
हाडाहुन राकट अन मनाहुन हळवी अशी ...
ही तुझी माझी मैत्री...

Friday, September 3, 2010

Rajgad





चांद मातला मातला








एकविसाव्या शतकातली

एक आहे ही गोष्ट, आटपाट नगरीची
यामद्धे आहेत अर्थातच, एक राजा- एक राणी !

पूर्वी सारखं नव्हे बरं,एकच राजा आणि एकच राणी,
एकविसाव्या शतकांत असते,
प्रत्येकाची स्वतंत्र नगरी,स्वतंत्र कहाणी!

आपल्या गोष्टितल्या राजाला,राणी आवडली अगदी सहजच
आणि राणीनेही संमती दिली,थोड्या हित्गुजांताच !

दोघांची मग सुरु झाली स्वतंत्र कहाणी,
दोघांची नगरी,
हिच्या मनाचा "तो" राजा,
त्याच्या मनाची "ही" राणी,

उघड्या डोळ्यानी दोघांनी,संसाराची स्वप्नं रचली,
आई-बाबा वगैरे ठीक,पण बालांची सुद्धा नावे ठरली !

प्रत्येक गोष्ट दोघांच्या मताप्रमाने,मनासारखी घडत होती,
राजा-राणी आणि त्यांची दुनिया एकमेकाताच गुरफतात होती !

राजाच्या घरी दोघांच्या नात्याची कुनकुन लागली,
आणि स्वप्नात सुद्धा विचार न केलेली वेळ आली !

घर की राणी? राजाच्या निर्णयाचा क्षण आला,
दोन प्रेमांच्या वेड्या चक्रात राजा बिचारा अड़कुन पडला!

२ वर्षांच प्रेम की २० वर्षांच नातं?
जन्मभराची साथ की कर्त्तव्य महत्तावाच?
नाजुक हळवे मन, की मेंदुतल्या विचारांचा पसरा?
"काय निवडू?" वेडा विचारे स्वताला...

ताजं कोवळ पान झाडा पासून गळल,
आणि राजा-रानिच स्वप्न ही धुलीला मिलाल !

तिच्या नाजुक हातातून, हात सोडवत नाही
मग त्याने हातच कापून ठेवला,
आणि मनातून तिचा विचार जात नाही
म्हणून मनाचा कप्पा अलगद बंद केला!

राणीला हा निर्णय सांगताना ,
अदृश्य रक्ताच्या चिल्कान्द्या उडाल्या ,
तिला सावरताना मात्र ,
त्याच्या प्रेमाचाच पूर्ण कस लागला!

वातावरण निवळल, दोघही सावरली !
मग दोघांनी समंजसपणे,
वेगवेगळी नगरी स्वीकारली !

एकमेकांच्या आठवणीना जपत,
तो बनला "त्याच्या" विश्वाचा राजा,
ती बनली "तिच्या" नगरिची राणी,
एकविसाव्या शतकातली,
स्वतंत्र नगरी,
स्वतंत्र कहाणी !!!