Monday, October 4, 2010

कान्हा

श्रावणाच गाण तुझ्या ओठी सुरु होत,
ऊन पावसाशी झिम्मा, मन खेळत बसतं॥

इन्द्रधनुच्या कमानीत तुझी कमनीय काया,
माझ्या मनाला मोहते,तुझी सप्तरंगी छाया॥

ओठी बासरी तुझ्या, तिचे वेडे खुले सुर,
चिंब पावसात भिजे, मन बनून मयूर॥

माथ्यावरी सजे मोरपिसं, जणू पाचूचा खड़ा,
आला बघा गं सयांनो, माझा कान्हा-सावला॥

त्याच्या सोनेरी देहाची, सोन्या सारखी किरणे,
तशी सोनेरी शेवंती, गाते पहाटेचे गाणे॥

माझ्या सावल्या देहात, "सावल्या"चेच चैतन्य,
दर्पणात पाहे मी, माझ्या सावल्या चे बिंब॥

नाही मी राधा, अन मीरा ही नाही
तरी तुझीच आस कान्हा धरून मी राही...
तरी तुझीच वाट कान्हा पाहत मी राही॥